Shiv Sena : ‘शिवसैनिकावर लक्ष नाही, एवढं करूनही…’, 3 माजी नगसेवक ठाकरेंची साथ सोडणार, शिंदेंच्या सेनेत जाण्यापूर्वी खदखद व्यक्त
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक बोलावल्यानंतर देखील ठाकरेंचे 3 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती होती. मात्र आज त्याचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच तीन माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. तीन माजी नगरसेवकांसह एक माजी शाखाप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहे. आजच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी तीन माजी नगरसेवकांसह एक माजी शाखाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून शिवसेनेचं शिवधनुष्य हाती घेणार आहेत.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी शाखाप्रमुख संजय जंगम आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीशी बोलताना माजी नगरसेवकाने असे सांगितले की, विभागप्रमुख म्हणून मी सर्व बैठकांना हजर राहिलो आहे. प्रक्षप्रवेश झाला की यासंदर्भात अधिक बोलेन असं एका ठाकरेंच्या माजी नगरसेवकानं म्हटलं तर संजय जंगम यांनी असे म्हटले की, ‘जी कार्यपद्धत सुरू आहे त्यावरून असं दिसतंय की शिवसैनिकावर लक्ष नाही. फार वाईट वाटतंय. पण शिंदेंच्या डोळ्यात दिसतंय की, कार्यकर्त्याला कसं जपावं आणि कामाची सेनेची आवड म्हणून शिवसेनेत प्रवेश करतोय’
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

