Uddhav Thackeray on Nilam Gorhe | मी नीलम ताईंचं अभिनंदन करतो,सभागृहात शिस्त कशीअसावी हे दाखवून दिलं
ठाकरे म्हणाले, मंत्री असो, आमदार असो की मग मुख्यमंत्री त्या सदस्याने विधीमंडळाचा पावित्र्य राखल पाहीजे. तर त्या सदस्याने सभागृहांत शिस्तीत वागलं पाहिजे.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे अभिनंदन केलं आहे. तर हे अभिनंदन करत असताना नीलम ताईंनी कोणाला झापलं हे महत्वाचं नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर ठाकरे म्हणाले, मंत्री असो, आमदार असो की मग मुख्यमंत्री त्या सदस्याने विधीमंडळाचा पावित्र्य राखल पाहीजे. तर त्या सदस्याने सभागृहांत शिस्तीत वागलं पाहिजे. आणि तुम्ही सभागृहात शिस्त कशीअसावी हे दाखवून दिलंत. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन विचारलेल्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. त्यावेळी गुलाबरावांनी आपल्याल बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले आणि बोलायला उभे राहिले. तर त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने छातीवर हात वगैरे मारला गुलाबराव पाटील बोलले. तर त्यांचा हा आक्रस्ताळेपणा पाहून नीलम गोऱ्हेंना राग अनावर झाला. आणि सभागृहात बोलण्याची ही पद्धत असते कय म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना झापलं
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

