Uddhav Thackeray Live | महापुरात जीवितहानी रोखण्यात यश आलं : उद्धव ठाकरे

ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येऊन गेला, तिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. पूर येण्यापूर्वीदेखील प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. सध्यादेखील या जिल्ह्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोव्हिड-19 बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. येथील जनतेने बेसावध राहून चालणार नाही.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, विविध जिल्ह्यांमधील निर्बंध, राज्यातील महापुरानंतरची परिस्थिती या विषयांवर ते राज्यातील जनतेशी बोलत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात जिथे पूर आला तिथेच कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय. असे म्हणत त्यांनी पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येऊन गेला, तिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. पूर येण्यापूर्वीदेखील प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. सध्यादेखील या जिल्ह्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोव्हिड-19 बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. येथील जनतेने बेसावध राहून चालणार नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI