मुंबईः सध्याच्या केंद्रीय यंत्रणा (Central Agencies) केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यासारख्या आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तिथं धाव घेतात, असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मंगळवारी जामीनावर सुटका झाली. त्यानंतर बुधवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी अत्यंत विजयी मुद्रेत संवाद साधला. तसेच कोर्टाने योग्य निर्णय दिल्याबद्दल कोर्टाचे आभार मानले.