Gunratna Sadavarte : सदावर्तेंच्या कानाखाली मारा अन् 1 लाख मिळवा, कुरळ्या केसांचा कुत्रा… म्हणत कुणी दिलं चॅलेंज?
सध्या राज्यात हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर मराठी माणसात जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र ५ जुलै रोजी हिंदी सक्ती शासन निर्णय रद्द केल्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन ठाकरे बंधूंकडून करण्यात आलंय. दरम्यान, याच मुद्द्यावरून सदावर्ते सातत्याने टीका करताना दिसताय.
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख रूपयांचं बक्षीस देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रशांत भिसे यांच्याकडून करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत गरळ ओकत आहेत, असंही प्रशांत भिसे यांनी म्हटलं आहे. ‘कुरळ्या केसांचा कुत्रा.. बेंबीच्या देठापासून बोंबलायला लागला आहे. आपल्या मराठी माणसांना शिव्या द्यायला लागलाय. पण आता जो कोणी गुणरत्न सदावर्तेंच्या कानाखाली वाजवेल, त्याला एक लाख रूपयांचं बक्षीस मी जाहीर करतो’, असं शिवसेनेचे नेते प्रशांत भिसे यांनी म्हटलंय. पुढे प्रशांत भिसे यांनी सदावर्ते यांचा उल्लेख कुत्रा असं करत हा कुत्रा त्याला ठोकल्याशिवाय तो गप्प बसणार नाही, याचे कर्ते करविते कोण आहेत. यांनी हे लक्षात घ्यावं की याच्या वर्तनामुळे त्यांच्याही प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हणत भिसे यांनी हा इशारा दिलाय.