शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा माँसाहेबांना सांगितले माझी बॅग भरुन ठेवा, उद्धव ठाकरे यांनी सांगितला तो किस्सा
खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांचा एक किस्सा सांगितला.
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज थाटामाटात झाले. यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. ते म्हणाले की तुम्ही शिवसेनेला संपवायला निघाला.शिवसेनेसाठी हा पहिला प्रसंग नाही. १९६९ साली शिवसेनाप्रमुखांनाही तुरुंगात ठेवलं होतं. १०० दिवस ठेवलं होतं. मोरारजी भाई उपपंतप्रधान होते. माहीम चर्चमध्ये मोरारजी भाई थांबतील आणि त्यांना शिवसेना निवेदन देईल आणि ते जातील असे ठरंल होतं. मला आठवतंय. आमच्याकडे अम्बेसेडर कार होती. त्यात मी आणि माँ होतो. पण मोरारजींचा तोफा वेगात आला. सर्वांना उडवून गेला. एका शिवसैनिकाच्या अंगावरुन गाडी गेली. तुफान राडा झाला. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं माँला सांगितलं माझी बॅग भरून ठेवा. रात्री आम्हाला तुरुंगात ठेवतील, त्यानंतर पहाटे त्यांना अटक झाली. तीन महिने शिवसेनाप्रमुख आत होते. त्यानंतर शिवसेना तीन महिने नेतृत्वहिन झाली होती. तरीही शिवसेना नंतर सत्तेत आली. आणीबाणीच्या काळात रजनी पटेल यांनी सांगितलं होतं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा..! नाही तर तुरुंगात टाकेल. तेव्हा शिवसेनाप्रमुख गरजले, मला तुरुंगात टाकाल तेव्हा तुमचीच अंत्ययात्रा निघेल. पटेल, मोरारजी देसाई, आणि आताचे … हेच लोक का शिवसेनेला का विरोध करीत आहे. कारण यांना मराठी माणसांना संपवयाचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

