जीवाला जीव देणारे शिवसैनिक…, उद्धव ठाकरे यांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
शिवसेना प्रमुखांसोबत कायम राहिलेले आणि जीवाला जीव देणारे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक होते आणि ते आपल्यातून निघून जातात हे फार दुर्दैव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते केंद्रीय मंत्री होते पण त्यापेक्षाही ते सच्चा, कट्टर शिवसैनिक होते. कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही नेत्यांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. मात्र कठीण परिस्थितीतसुद्धा मनोहर जोशी हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले, शिवसेना प्रमुखांसोबत ते कायम राहिले. जीवाला जीव देणारे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक होते आणि ते आपल्यातून निघून जातात हे फार दुर्दैव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. दरम्यान, आज उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला आजचा बुलढाण्यातील नियोजित दौरा रद्द केला आहे.
Published on: Feb 23, 2024 12:07 PM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
