अमित शाह यांच्या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्याचा पलटवार, शिंदे गटावरही जोरदार प्रहार; म्हणाला, ‘गद्दारांना’
उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी फक्त ठाकरे यांनी सत्तेसाठी भाजपला धोका दिल्याचं म्हटलं. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. याचमुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. येथे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी फक्त सत्तेसाठी भाजपला धोका दिल्याचं म्हटलं. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. याचमुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. जर शिवसेना सत्तेसाठी हापापलेली असती तर गेलेल्या गद्दारांना उद्धव ठाकरे हे हालायला देखील दिलं नसते. पण ठाकरे यांनी थेट गद्दारांना जा म्हणून सांगितलं. तर ज्या गद्दारांना गद्दारी करायचीच आहे त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता असेही दानवे यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

