वांझोट्या भेटींवरून ठाकरे-शिंदे गटात जुंपली; दानवेंच्या टीकेला केसरकरांचे उत्तर
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नुसत्या वांझोट्या भेटी आहेत. मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या भेटी करण्याच्या ऐवजी मदत आणि घोषणा करावी असे म्हटलं होतं
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना काही दिवसांपासून जोरदार अवकाळी आणि गारपिटी सामोर जावं लागत आहे. सततच्या अवकाळी आणि गारपिटीमुळे नाशिक, अहमदनगर, जळगाव, धाराशिव भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकसान ग्रस्त भागाचे दौरे सुरू केले आहेत. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नुसत्या वांझोट्या भेटी आहेत. मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या भेटी करण्याच्या ऐवजी मदत आणि घोषणा करावी असे म्हटलं होतं. त्यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देत दानवेंना टोला लगावला आहे. केसरकर यांनी, वांझोट्या भेटी कशा करायच्या ते अंबादास दानवे यांनी माजी मुख्यमंत्र्यांकडून शिकून घ्यावं, असं म्हटलं आहे. यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे-शिंदे गट एकमेकांच्या समोर आले असून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

