Unseasonal Rain : जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
Unseasonal Rains in Latur Udgir : राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. सलग दोन दिवसांपासून या भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आंबा बागायतदारांचं चांगलच नुकसान झालं आहे.
राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी पूर्व मशागतीवर देखील या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

