AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'यूपी देशातील नंबर एकचा प्रदेश बनेल' - UP CM Yogi Adityanath

‘यूपी देशातील नंबर एकचा प्रदेश बनेल’ – UP CM Yogi Adityanath

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 7:48 PM
Share

उत्तर प्रदेशसह भाजपचा वियजाचा (Uttar Pradesh BJP Win) वारू पुन्हा एकदा चौफेर उधळलाय. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात येतोय.

उत्तर प्रदेशसह भाजपचा वियजाचा (Uttar Pradesh BJP Win) वारू पुन्हा एकदा चौफेर उधळलाय. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात येतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप कार्यकर्ते आणि जनतेचं असल्याचं म्हटलंय. मोठ्या विजयनानंतर योगी लखनऊतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी फुलांची उधळण करत योगींचं जंगी स्वागत करण्यात आलंय. त्यावेळी बोलताना योगींनी पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिल्याचं म्हटलं. योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनत आहे. या सर्व राज्यात पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिलाय. मी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि सर्व नेत्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप चार राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरला. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. आज भाजप आणि मित्र पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार मानतो.

Published on: Mar 10, 2022 07:48 PM