Vaishnavi Hagawane : आईविना लेकरची हेळसांड; 6 दिवस हगवणेंनी बाळाला वैष्णवीच्या कुटुंबापासून लवपवून ठेवलं
Vaishnavi Hagawane Case Updates : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या बाळाला गेले 6 दिवस हगवणे कुटुंबाने लपवून ठेवलं होतं. आज अखेर हे बाळ कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे.
हुंड्यासाठी केलेल्या छळानंतर पुण्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली आहे. यानंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे मात्र अतोनात हाल झाले. या 6 दिवसात वैष्णवीच चिमूकलं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबात राहिलं. वैष्णवीच्या सासरच्या निर्दयी हगवणे कुटुंबामुळे या बाळाचे चांगलेच हाल झाले आहे. 6 दिवस हे बाळ हगवणे कुटुंबाने कसपटे कुटुंबापासून लपवून ठेवलं आहे.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा नवरा शशांक हगवणे याला अटक झाली. त्यानंतर हे बाळ शशांकची बहीण म्हणजेच बाळाच्या आत्त्याकडे होतं. त्यानंतर हे बाळ नीलेश चव्हाणकडे आलं. नीलेश चव्हाण हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. त्यानंतर हे बाळ अण्णा पवळे यांच्याकडे आलं. अण्णा पवळे हे राजेंद्र हगवणे यांचे नातेवाईक आहेत आणि आज अखेर हा 9 महिन्यांचा चिमुरडा त्याच्या आज्जी आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलेला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

