Vaishnvi Hagawane Case : हगवणेला शिवाजीनगर कोर्टात आणलं, भाजप कार्यकर्ते आक्रमक
Rajendra Hagawane, Sushil Hagawane In Court : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज हगवणे पितापुत्राला कोर्टात हजर केलं जाणार आहे. भाजपने याबद्दल हगवणे कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजपकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. याठिकाणी थोड्याच वेळात हगवणे पिता-पुत्राला हजर केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र हगवणेच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे.
वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी छळ केल्यानंतर तिने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानानर हगवणे कुटुंबाचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. आज पोलिसांनी स्वारगेट परिसरातून राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे याला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत या दोघांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. काही वेळातच शिवाजीनगर कोर्टात या दोघांना हजर केलं जाईल. त्याच पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. भाजप महिला आघाडीकडून हे आंदोलन सुरू आहे.