Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल; धक्कादायक माहिती आली समोर
Vaishnavi Hagawane PM Report : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवी माहिती पुढे आली आहे. वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला असून त्यातून अनेक मोठे खुलासे झालेले आहेत.
पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल टीव्ही9 च्या हाती आला आहे. वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळून आल्या असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. वैष्णवीचं लग्न अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्याशी झालेला होता. यावेळी लग्नात फोरचूनर गाडी, 51 तोळे सोनं आणि 7.5 किलो वजनाचं चांदीचं ताट वैष्णवीच्या वडिलांनी दिलं होतं. असं असूनही तिचा हुंड्यासाठी छळ झाल्याचं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणण आहे. आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात वैष्णवीच्या शरीरावर जखमा असून या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हंटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर घास..., मनसेचा ठाकरेंवर निशाणा

माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?

लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण...

मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका
