Vaishnavi Hagawane : पुण्यातून कोल्हापूरात गेला, हॉटेलात जेवणावर ताव मारला; हगवणे फरार असताना कुठे-कुठे हिंडला?
TRajendra Hagawane Arrested By Police : राजेंद्र हगवणे याला आज पोलिसांनी अटक केलेली आहे. अटके पूर्वी हगवणे पितापुत्र कुठे कुठे गेले होते याची माहिती आता समोर आली आहे.
वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे याला आज स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आलेली आहे. मात्र राजेंद्र हगवणे हा तिथून देखील पळून जाण्याच्या तयारीत होता. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तिचा पती शशांक, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार होते. आज अखेर त्यांच्या देखील मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावर राजेंद्र हगवणे हा बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसलेला होता. त्यानंतर हे दोघ बाप लेक पुण्यातून कोल्हापूरला गेले. कोल्हापुरातून पुन्हा पुण्यात येत दोघं पवना डॅम परिसरात लपले. तळेगाव दाभाडे आणि स्वारगेट परिसरात हगवणे पितापुत्र दिसून आले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

