देशात आणि राज्यात ईदी अमिनचे राज्य हुकूमशाही सुरू, संजय राऊतांचा घणाघात
'वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो कायम आहे.',महाविकास आघाडीची यादी कधी, वंचितसाठी काय आहे प्रस्ताव? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले
शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी तयार आहे. आज ती यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांनी आपले जागावाटप पूर्ण केले आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो कायम आहे. त्यांच्याशी याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे तर देशात आणि राज्यात ईदी अमिनचे राज्य हुकूमशाही सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच गिळण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

