Operation Sindoor : शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने सामर्थ्य दाखवले – व्हाइस अॅडमिरल ए.एन.प्रमोद
'अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून, आम्ही सतत देखरेख ठेवत आहोत. जेणेकरून काही धोके असतील तर ते कमी केले जाऊ शकतात किंवा निष्प्रभ केले जाऊ शकतात'
ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक यांच्यातील तणावादरम्यान, DGMO ने आजही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. व्हाईस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी नुकतीच भारतीय नौदलाने हवाई क्षेत्रासह सर्वत्र कडक देखरेख कशी ठेवली या बद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, जल, हवा यासह पृष्ठभागावरून आणि पाण्याखालील धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. नौदलाने रडार आणि इतर उपकरणांचा वापर करून सतत देखरेख ठेवली आहे, जेणेकरून धोक्यांना वेळेत निष्प्रभ करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होतं. आम्ही लढाऊ आणि गुप्तचर विमाने तैनात केली होती. आम्ही अत्याधुनिक रडारचा वापर करत आमचे वैमानिक दिवसरात्र सज्ज होते. आम्ही शेकडो किलोमीटरचे निरीक्षण केले. कोणत्याही संशयास्पद किंवा शत्रूच्या विमानाला कित्येक किलोमीटर जवळ येण्याची संधी दिली नव्हती. आमच्या शक्तिशाली कॅरियर बॅटल ग्रुपमुळे पाकिस्तान भारताच्या नौदल क्षमतेला कोणतेही आव्हान देऊ शकला नाही, अशी माहिती व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी दिली.
#WATCH | Delhi: Vice Admiral AN Pramod says, "Effectively using multiple sensors and inputs, we are maintaining continuous surveillance to degrade or neutralise threats as they emerge or manifest to ensure targeting at extended ranges. All these are conducted under the umbrella… pic.twitter.com/emSuQ4TfFK
— ANI (@ANI) May 12, 2025