Special Report | विराटनं गांगुलीशी घेतला पंगा !
विराट कोहलीने (Virat kohli) टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून ते वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याबाबतच्या घटनाक्रमावर महत्त्वाची माहिती दिली. विराटने टी-20 चं कर्णधारपद सोडण्याबाबत आज जे पत्रकार परिषदेत सांगितलं, त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई: कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour) रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat kohli) टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून ते वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याबाबतच्या घटनाक्रमावर महत्त्वाची माहिती दिली. विराटने टी-20 चं कर्णधारपद सोडण्याबाबत आज जे पत्रकार परिषदेत सांगितलं, त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निर्णयाचा पूनर्विचार करण्यास सांगितलं नाही
कोहलीने गांगुलीचे वक्तव्य खोडून काढलं. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या माझ्या निर्णयाचा बीसीसीआयने स्वीकार केला. निवड समिती सदस्य किंवा अन्य कोणीही मला माझ्या निर्णयाचा पूनर्विचार करण्यास सांगितले नाही, असे विराट म्हणाला.
टी-20 संघाचे कर्णधारपद सोडताना विराटने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत पदाधिकारी आणि निवड समिती सदस्यांचा कुठलाही निर्णय आपल्याला मान्य असेल, असे कोहलीने बीसीसीआयला आधीच सांगितले होते. बुधवारी पत्रकार परिषदेत कोहलीने ही माहिती दिली.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

