मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर, म्हणाल्या…

मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर, म्हणाल्या…

| Updated on: Mar 03, 2026 | 3:17 PM

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने आणि ड्रोन हल्ल्यांमुळे त्याची सुटका थांबली आहे. गंभीर परिस्थिती पाहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. त्याला तातडीने भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची विनंती आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. लंडनला निघालेला त्यांचा मुलगा कुवेतमध्ये लेओव्हरसाठी उतरला होता, मात्र हवाई क्षेत्र बंद झाल्याने आणि परिसरात ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने तो तिथेच अडकून पडला आहे.

गेल्या चार दिवसांपासून तिथे अडकल्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली असल्याचे स्वतः विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओद्वारे सांगितले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी आर्त विनंती केली आहे. त्यांचा मुलगा तिथे होत असलेले हल्ले अनुभवत असून, त्याची त्वरित सुटका करण्याची गरज आहे. एअरलाइन्स आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाने त्याच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये केली आहे. परंतु, आता त्याला सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची तातडीने व्यवस्था करावी, असे सुभेदार यांनी आवाहन केले आहे. या बिकट परिस्थितीत सरकारकडून तातडीने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Published on: Mar 03, 2026 03:15 PM
Follow Us