ड्रेस कोडच्या मोहिमेत विश्व हिंदू परिषदेची उडी, राज्यातील मंदिरांना केलं ‘हे’ आवाहन
VIDEO| विश्व हिंदू परिषदेचं महाराष्ट्रासह गोव्यातील मंदिरांना आवाहन, ड्रेस कोड बाबत नेमकं काय म्हणाले?
मुंबई : राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. इतकेच नाही तर विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्रसह गोव्यातील मंदिरांना देखील याबाबत आवाहन केले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मठ मंदिर विभागाकडून ड्रेस कोड संदर्भातील संपर्क आता सुरू झाला आहे. विश्व हिंदू परिषदेनेही महाराष्ट्रातील मंदिरांसाठी ड्रेस कोडची मागणी सुरू केली आहे. मंदिरांच्या ड्रेस कोडबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे तो स्वागतार्ह असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. सर्व मंदिरांनी त्याचे पालन केले पाहिजे, सर्व मंदिरांनी त्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र टेंपल फेडरेशनतर्फे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येत असून, नागपूर तसेच विदर्भातील अनेक मंदिरांनी त्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र टेम्पल असोसिएशनच्या या मार्गदर्शक तत्त्वाला विश्व हिंदू परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेने लोकांना मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचे आवाहन केले आहे.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

