मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
वाशिम जिल्ह्यात भाजपने महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भाजपने ग्रामपंचायत स्तरावर पक्षविस्ताराला गती दिली आहे. “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून येत आहे.
या पक्षप्रवेशामुळे वाशिममधील महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.