Paithan : मुख्यमंत्र्यांच्या सभेत पैठणकरांना काय मिळाले? त्या घोषणा कोणत्या
पैठणची साडी ही देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. या साडीच्या उत्पादनासाठी क्लस्टर मिळवून देणार तर साडी उत्पादनासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर पैठणच्या देवस्थान विकासासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी आहे. त्यावर देखील मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद : (CM Ekanth Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या सभेत (Paithan) पैठणकरांना काय मिळणार याकडे सर्व मतदार संघाचे लक्ष लागले होते. पैठणची साडी ही देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. या (Paithan Saree) साडीच्या उत्पादनासाठी क्लस्टर मिळवून देणार तर साडी उत्पादनासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर पैठणच्या देवस्थान विकासासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी आहे. त्यावर देखील मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. व शहराच्या पाणीपुरठ्यासाठीही पैसे कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

