Mahadev Jankar On Cabinet Expansion | रासपला ही हवा सत्तेत वाटा , महादेव जानकरांचा एका जागेवर दावा

Mahadev Jankar On Cabinet Expansion | भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने मंत्रीमंडळ विस्तारात एका जागेची मागणी केली आहे.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 08, 2022 | 4:43 PM

Mahadev Jankar On Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion)चाहूल लागताच आता भाजपचा मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने यांनी एका जागेवर दावा सांगितला आहे. 2014 पासून राष्ट्रीय समाज पक्ष (Rastriya Samaj Party) हा भाजपसोबत (BJP) आहे. पक्षाने 6 जागांवर निवडणूक लढवली, त्यात एका जागेवर निवडणूक जिंकली. मंत्रीपद दिले. एक महामंडळही दिले. त्यानंतर लोकसभेसाठी रासपचा विचार झाला नाही. गेल्या निवडणुकीत तर विधान सभा ही दिली नाही, असे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले. त्यानंतर भाजपने विधान परिषद दिली. त्यामुळे यावेळी गेल्या महिन्यातच पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यात मंत्रीमंडळात एक कॅबिनेट, एक महामंडळ आणि विधान परिषदेवर एक जागा अशी मागणी आपल्या पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती जानकर यांनी दिली. भाजपने आता मित्र पक्षाला सन्मानाची वागणूक द्यावी असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें