AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LokSabha Election 2024 : पुण्यात काय घडणार? वसंत मोरे मनेसेचे पहिले खासदार होणार का?

LokSabha Election 2024 : पुण्यात काय घडणार? वसंत मोरे मनेसेचे पहिले खासदार होणार का?

| Updated on: Oct 18, 2023 | 11:32 PM
Share

मनसेनं पुणे लोकसभेकडे यंदा विशेष लक्ष दिलंय. मनसे नेते अमित ठाकरेंकडे पुण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. राज ठाकरे यांचे दौरेही पुण्यात वाढले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं एकही उमेदवार दिला नव्हता.

पुणे | 18 ऑक्टोंबर 2023 : मनसे यंदा पुणे लोकसभा लढणार अशी चर्चा आहे. पुण्यातील मनसेचा चेहरा वसंत मोरे यांचं नाव लोकसभा उमेदवार म्हणून पुढे आलंय. मनसेच्यावतीनं वसंत मोरे यांना लोकसभेचं तिकीट जवळपास नक्की मानलं जातंय. मनसेचे माजी नगरसेवक माजी शहराध्यक्ष आणि फायरब्रान्ड नेते वसंत मोरे हे खळखट्याक आंदोलनांनी नेहमीच चर्चेत राहिलेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे पोस्टर्स झळकले. खुद्द वसंत मोरे यांनीही पक्षानं संधी दिल्यास पुण्यातून लोकसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पुण्यात मनसेला तसेच वसंत मोरे यांचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसरमधून निवडणूक लढविली होती. पण, त्यांच्या उमेदवारीचा भाजपाला फटका बसला. त्यामुळे येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. पण, आता वसंत मोरे यांनी कबर कसली असून ते थेट लोकसभेच्या रीग्नता उतरणार आहेत. गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजप लोकसभेत कुणाला तिकीट देईल? हे अद्याप निश्चित झालेलं नाही. महाविकास आघाडीतूनही उमेदवार ठरलेला नाही आहे. अशातच मनसेनं वसंत मोरे याचं नाव जाहीर केल्यास पुण्यात काय घडणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Oct 18, 2023 11:32 PM