Nana Patole : सरकार कोसळेल तेव्हा त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल, नाना पटोले यांची टीका

शिंदे सरकार लवकर पडणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात आधी सहा महिन्यात हे सरकार कोसळणार असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं म्हटलं होतं. तर यानंतर आता पटोलेंनी टीका केलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jul 06, 2022 | 11:55 AM

सोलापूर:  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा महिन्यात नाही, पण वर्षभरात शिंदे सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे सरकार कधी कोसळणार याबाबत आघाडीतच संभ्रम असल्याचं दिसत आहे. शिंदे सरकार लवकर पडणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वात आधी सहा महिन्यात हे सरकार कोसळणार असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून ते थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. पवारांनी डिसेंबरपर्यंत मध्यावधी निवडणुका होतील असं सांगितलं. तर यानंतर आता पटोलेंनी टीका केलीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें