AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : सत्ता गेल्यावर तोल जातो, मुनगंटीवारांचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 28, 2022 | 5:02 PM
Share

पीएफआय संघटनेमुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम आता इतरत्र बाबींवरही होत आहे. RSS संघटनाही बंद करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या या मागणीला मुनगंटीवारांनी खरमरीत उत्तर दिले आहे.

राहुल झोरी टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी मुंबई : पीएफआय वरुन आता आरएसएस (RSS) वर देखील बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर भाजप नेते तुटून पडले असून RSS मुळे देशात एकही अशी घटना घडलेले नाही की जी नियमबाह्य आहे. सत्ता गेल्यावर असे होतेच, त्यामुळे अर्थहीन मागण्या केल्या जात आहेत. शिवाय गेली अडीच वर्ष सत्ता तुमची होती तर मग का RSS वर बंदी घातली नाही. असा सवाल सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी उपस्थित केला आहे. जनतेला विरोधकांची पोटदुखी ही समजत आहे. त्यामुळे आता लपून काहीच राहत नाही असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या कार्यकर्त्यांनी महिला पदाधिकाऱ्यास शिवीगाळ केली होती, तर एखाद्या आमदाराचे वक्तव्य ही पक्षाची भूमिका असू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्हीही नेते संवेदनशील असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 28, 2022 05:02 PM