Baba Siddique Shot Dead : ‘त्या’ एका व्यक्तीच्या बदल्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या? बिश्नोई गँगने नाव घेतलेला अनूज थापन कोण?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली असून बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली तर बिश्नोई गँगकडूनही बाबा सिद्दीकींच्या हत्येशी संबंधित असलेल्या अनूज थापन याचाही उल्लेख करण्यात आलाय. कोण आहे अनूज थापन?

Baba Siddique Shot Dead : 'त्या' एका व्यक्तीच्या बदल्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या? बिश्नोई गँगने नाव घेतलेला अनूज थापन कोण?
| Updated on: Oct 13, 2024 | 5:45 PM

बिश्नोई गँगमधील एका सदस्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध, असे बिश्नोई गँगने म्हटले आहे. दरम्यान, कोण होता अनूज थापन ज्याचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. तर या अनूज थापन ज्याचा बदला घेतल्याची पोस्ट बिश्नोई गँगकडून करण्यात आली आहे. अनूज थापन हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर होता. १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकऱणात अनूज थापन हा आरोपी होता. अनूज थापनने गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना बंदूक पुरवली होती. तर २४ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अनूज थापनला पंजाब येथून अटक केली होती. तर १ मे रोजी अनूज थापनचा मुंबई पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. अनूज थापनने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, त्याने आत्महत्या केली नाहीतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.

Follow us
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.