Who is Rajan Salvi : बाळासाहेब ठाकरेंनी गौरवलेला रत्नागिरीतील पहिला शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?, ही गोष्ट माहीत आहे का?
२००६ मध्ये राजापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राजन साळवींचा पराभव झाला. मात्र त्यानंतर २००९ ते सलग २०१९ पर्यंत ते शिवसेनेकडून आमदार होते.
कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं धनुष्णबाण हाती घेतलं आहे. ठाण्यातील आनंद मठात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यावेळी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत राजन साळवी?
शिवसेनेचा लढवय्या शिवसैनिक ते नेता, कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची खर तर ओळख आहे. शिवसेनेमधल्या बंडानंतर अनेक जण शिंदेंच्या सोबत गेले. मात्र राजन साळवी त्याही वेळेला ठाकरेंकडे राहिले. मात्र यावेळी २०२४ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील पहिला शिवसैनिक
राजन साळवी राजापूर विधानसभेचे तीन टर्म आमदार राहिले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजन साळवींची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९३-९४ च्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले. राजन साळवींनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगर अध्यक्ष पद भूषवलं. रत्नागिरी जिल्ह्याच जिल्हा प्रमुख पद ही राजन साळवींनी सांभाळलं. २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही राजन साळवींचा विधानसभेत विजय झाला. मात्र २०२४ च्या विधानसभेत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून साळवींचा पराभव झाला. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींनी उपनेते पदांचा राजीनामा दिला. विधानसभेत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा राजन साळवी यांचा आरोप आहे. तर अवैध मालमत्ता प्रकरणी ईसीबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी ही करण्यात आली होती.

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार

'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
