Aaditya Thackeray : कामाची चौकशी झाली तरी आनंदच, आदित्य ठाकरे असे का म्हणाले?

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेतून बंड केलेले आमदार हे नजरेत नजर घालून बघू शकत नव्हते. त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण चूकच केली हा भाव चेहऱ्यावर असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत. फक्त वाईट ह्याच गोष्टीचे वाटतंय की, ते पाठीत खंजीर खूपसून गेले. शिवाय तिथेही गद्दरांना स्थान नाही. तर अपक्ष आणि महिलांवर मंत्रिमंडळाबाबतीत निराशच पदरात पडली आहे.

अक्षय मंकनी, प्रतिनिधी

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 17, 2022 | 8:35 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन ही दोन खाती होती. आता शिंदे सरकारच्या काळात त्यांच्या कामाची चौकशी ही होणार आहे. केंद्र आणि राज्यसरकारकडून ही चौकशी होणार आहे. याबाबत आपल्याला आनंदच होत आहे, कारण त्या काळात झालेली कामे ही चौकशी करुन का होईना जनतेच्या समोर येणार आहेत. गेल्या दोन वर्षात आम्ही मार्केटमध्ये कमी पडलो ते काम आता सरकारच करीत असल्याचा आनंद होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवाय आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेतून बंड केलेले आमदार हे नजरेत नजर घालून बघू शकत नव्हते. त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण चूकच केली हा भाव चेहऱ्यावर असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत. फक्त वाईट ह्याच गोष्टीचे वाटतंय की, ते पाठीत खंजीर खूपसून गेले. शिवाय तिथेही गद्दरांना स्थान नाही. तर अपक्ष आणि महिलांवर मंत्रिमंडळाबाबतीत निराशच पदरात पडली आहे. शिंदे सरकारमध्येही गोंधळ सुरु आहे. तिथेही नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना फक्त आता व्यक्त होता येत नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें