‘मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलं’, असं का म्हणाले नितीन गडकरी?
नागपुरात मैदानांची संख्या १८० पर्यंत पोहचल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या मैदानांची संख्या २५० च्या घरात नेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात एक लाख मुलामुलींनी सकाळ संध्याकाळ मैदानात खेळायला हवे, असे आपले स्वप्न असल्याचेही गडकरींनी सांगितले. यावेळी आपल्याला कशाची चीड येते हेही गडकरींनी सांगितले..
नागपूर : नागपुरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात या वर्षी ३२ खेळ खेळवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी यात ५५ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यासाठी ८० मैदाने तयार करण्यात आली होती, आता नागपुरात मैदानांची संख्या १८० पर्यंत पोहचल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. या मैदानांची संख्या २५० च्या घरात नेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात (Nagpur)एक लाख मुलामुलींनी सकाळ संध्याकाळ मैदानात खेळायला (sports activities)हवे, असे आपले स्वप्न असल्याचेही गडकरींनी सांगितले. यावेळी आपल्याला कशाची चीड येते हेही गडकरींनी सांगितले. तसेच आपल्याला सर्वाधिक चीड आणणारी गोष्ट काय असेल तर चार–पाच वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाईल असतो. असं गडकरी म्हणाले. मी माझ्या सुनेला सांगितलं की तुझा मोबाईल घरातून खाली फेकून दे, घरात मोबाईल नकोच. मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलंय. काही तंतत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. असेही ते म्हणाले.
Published on: May 07, 2022 07:44 PM
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
