अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले, ‘साहेबांची चर्चा होते…’
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त करून आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 2-3 दिवसात त्यावर प्रतिक्रिया पाहावयास मिळेल असे सुचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.
रायगड : 28 सप्टेंबर 2023 | अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळ काढूपणा करतात. अपात्र आमदारांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे सांगितलेच आहे. त्यामुळे 2 ते 3 दिवसात त्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतील असे आमदार जयंत पाटील म्हणाले. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी तटकरे रोजच पक्ष बदलतात. ते कुठल्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हेच कळत नाही. ज्यांनी पक्ष बदलले त्यांच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. ते पक्ष बदलतात आणि शरद पवारांना भेटायलाही जातात, त्यामुळे ते कुठल्या पक्षात आहेत तेच सांगता येत नाही असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार साहेब यांच्यासोबत जी चर्चा होते त्यावरून तरी राष्ट्रवादीचे अजित पवार गट परत येणे शक्य नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

