दसरा मेळाव्याच्या वादानंतर आता शिवसेनेची ‘या’ ठिकाणी कोंडी करणार
दसरा मेळाव्यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारकडून नवी रणनिती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी करण्यासाठी भाजपची (BJP) ही रणनिती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बीएमसीमध्ये (BMC) तीन लाख कोटींचा गौरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्या 25 वर्षांतील महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांची चौकशी करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

