पक्ष गमावल्यानंतर शरद पवारांना 4 पर्यंत चिन्ह द्यावं लागणार, ‘या’ चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, शरद पवार गटाला आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह द्यावं लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह सूचवा असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला सांगण्यात आलंय.
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालंय तर या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान शरद पवार गटाला तीन चिन्ह सूचवण्यात आली आहेत. त्यापैकी उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, शरद पवार गटाला आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह द्यावं लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह सूचवा असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला सांगण्यात आलंय. तर आज दुपारपर्यंत शरद पवार गटाने नावं चिन्ह न दिल्यास निवडणुकीत अपक्ष मानण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

