केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
राज्यात मुख्यमंत्री पदावरुन घोळ सुरु असताना आणि राज्यातील जनता सरकार स्थापण होण्याची वाट पाहात असताना आज अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सांगितली.

राज्यात विधानसभेचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात मुख्यमंत्री पदावरुन गुंता झालेला आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदे घेत सर्व बाबी क्लीअर केल्या. काल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोन करुन राज्यातील सरकार बनविण्याबद्दल निर्णय घेताना आपला काही अडसर येणार नसल्याचे सांगितले आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. जो निर्णय मोदी साहेब घेतली त्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे पूर्ण समर्थन आहे.आता उद्या महायुतीचे सरकार स्थापण होण्याबाबत साधक बाधक चर्चा होईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांना वारंवार केंद्रात जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us