औरंगाबादेत जमावबंदी, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार का?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, यासंदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त पुढील दोन दिवसात घेतील, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 26, 2022 | 3:03 PM

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, यासंदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त पुढील दोन दिवसात घेतील, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केलं आहे. भोंगे, हनुमान चालिसा, रमजान ईद आदी विषयांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संवेदनशील वातावरण असून औरंगाबादमधील (Aurangabad MNS) राज ठाकरे यांची सभा होणार की नाही असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्पाला पडला आहे. गृहमंत्रालयातर्फे या विषयावर काय निर्णय घेतले जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी पत्राकारांनी गृहमंत्र्यांना याविषय़ी प्रश्न विचारला असता, त्यांनी यासंदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस घेतील, असे स्पष्ट सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें