Sambhajinagar News : पगार होत नसल्याने विट्स हॉटेलचे कर्मचारी आक्रमक
Hotel VITS Controversy : संजय शिरसाट यांच्या मुलाकडून विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असलेलं हॉटेल विट्स सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
संभाजीनगर येथील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विट्स हॉटेलचे कर्मचारी पगार होत नसल्याने आक्रमक झालेले आहेत. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हा या हॉटेलच्या खरेदीच्या प्रयत्नात होता. तब्बल 67 कोटी रुपये खर्चून हे हॉटेल खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या हॉटेल खरेदीच्या लिलाव प्रक्रियेवर विरोधकांकडून संजय शिरसाट यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता पालकमंत्री शिरसाट यांनी या लिलाव प्रक्रियेतून अर्ज मागे घेतला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती देखील दिली.
दरम्यान, या सर्व राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगरचं हॉटेल विट्स मात्र चांगलंच चर्चेत आलं आहे. आता या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा पगार थकवलेला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे हॉटेलचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

