Ranganath Pathare | Part 1 | ‘तथाकथित लेखकांनी ब्राह्मण वाचकांसाठी लिहिलं, पाटलाला बाईबाजी करणारं दाखवलं’

ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे म्हणाले, "फडक्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पुनरावृत्ती आहे. 2-3 पुस्तकं वाचली तरी तोचतोचपणा लक्षात येतो. त्यामुळेच मला त्यात मौलिक असं काही नसल्याचं वाटलं. अनेक तथाकथित लेखकांच्या लेखनात खेड्यातील माणूस विनोदाचा विषय राहिलेला आहे. या लेखकांनी गावातल्या पाटील किंवा सरपंचाला कायम बाईबाजी किंवा दारुबाजी करताना दाखवलं."

Ranganath Pathare | Part 1 | ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे म्हणाले, “फडक्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पुनरावृत्ती आहे. 2-3 पुस्तकं वाचली तरी तोचतोचपणा लक्षात येतो. त्यामुळेच मला त्यात मौलिक असं काही नसल्याचं वाटलं. अनेक तथाकथित लेखकांच्या लेखनात खेड्यातील माणूस विनोदाचा विषय राहिलेला आहे. या लेखकांनी गावातल्या पाटील किंवा सरपंचाला कायम बाईबाजी किंवा दारुबाजी करताना दाखवलं. मात्र, मी पाहिलेलं गाव वेगळं होतं. तेथे असं काहीच नव्हतं. दुष्काळाच्या कामात सरपंच आणि पाटीलही यायचे.” यावेळी त्यांनी सुरुवातीच्या काळात मुख्यत्वे वाचक पुणे मुंबईसारख्या शहरातील ब्राह्मण असल्यानं लेखकांनी ब्राह्मण वाचक डोळ्यासमोर ठेऊनच लिहिल्याचंही निरिक्षण त्यांनी मांडलं. | Writer Rangnath Pathare comment on Marathi literature and rural Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI