VIDEO | सरपंच म्हणून निवड झाली अन् आनंद गगनात मावेना; तरुणाकडून नोटांची उधळण

दावडी या गावात सरपंच म्हणून निवड झाल्याच्या आनंदात एका तरुणाने नोटांची उधळण केली आहे. (young sarpanch blowing money)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:15 PM, 25 Feb 2021

पुणे : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुका जिंकत सरपंचपदाची खुर्ची मुळवून अनेकांनी गावाचा कारभार हाकायला सुरुवात केली आहे. मात्र, पुण्यातील खेड तालुक्यात दावडी गावात एक वेगळाच प्रकार घडला आहे. दावडी या गावात सरपंच म्हणून निवड झाल्याच्या आनंदात एका तरुणाने नोटांची उधळण केली आहे. त्याने पैसे थेट हवेत उधळले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. (young sarpanch blowing money in air because of selection as sarpanch)

राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. वेगवेगळ्या गावात सरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील दावडी गावातही  सरपंचपदाची निवड केली जात होती. या गावात एका तरुणाची सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर त्याने थेट नोटांची उधळण सुरु केली. त्याने गावातील चावडीवर नोटांचे वाटप सुरु केले. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसलं.

तरुण सरपंचाने पैशांची उधळण केलेला व्हिडीओ :

 

दरम्यान, या प्रकारामुळे खेड तालुक्यातील हा तरुण सरपंच चांगलाच चर्चेत आला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : काढून टाका ते, संभाजी भिडेंनी सेना आमदाराला मास्क काढायला लावला