AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये संजय राऊतांबद्दल तीव्र नाराजी, माफीची मागणी?

संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा मतप्रवाह भाजपमधील एका गटात आहे.

भाजपमध्ये संजय राऊतांबद्दल तीव्र नाराजी, माफीची मागणी?
| Updated on: Nov 07, 2019 | 1:27 PM
Share

मुंबई : ‘सामना’च्या अग्रलेखातून दररोज उठवली जाणारी टीकेची झोड, पत्रकार परिषदेतून ओढले जाणारे ताशेरे यासारख्या अनेक कारणांमुळे भाजपमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी तीव्र संताप असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा मतप्रवाह भाजपमधील एका गटात असल्याचं ‘टीव्ही9 मराठी’च्या सूत्रांनी (BJP angry with Sanjay Raut) सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना 50-50 चा फॉर्म्युला, उपमुख्यमंत्रिपद यावर अडून बसली आहे. संजय राऊत दररोज ‘सामना’चे अग्रलेख आणि पत्रकार परिषदा घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडतात. फडणवीसांनी कुठलाच फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितल्यावर राऊतांनी जुना व्हिडीओ लावत त्यांना आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा मतप्रवाह भाजपमधील एका गटात आहे.

संजय राऊत यांची भाजपवरील 9 वक्तव्यं

ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतींची धमकी सुरु, पण राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत

राष्ट्रपती राजवटीचा धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा, असा घणाघाती पलटवार संजय राऊत यांनी केला होता.

सत्तास्थापनेसाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करतंय 

भाजपकडून सत्तेसाठी विरोधकांना लक्ष्य करून संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता.

शिवसेना फार पुढे गेली आहे, त्यामुळे दरवाजा खुला आणि दारांच्या फटीला महत्त्व नाही

भाजपचे दरवाजे खुले, खिडक्या उघड्या, दाराला फटी. कुणी कशातून घुसायचं हा प्रश्न राहिलाच नाही. ते प्रस्ताव मिळाला नाही असं म्हणत आहेत. यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 50-50 चा जो फॉर्म्युला ठरला होता तोच प्रस्ताव आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

मी काय एमआयएमचा नेता आहे का? 

शिवसेना पुढे येऊन बोलत नाही. प्रस्ताव देत नाही या भाजपच्या आरोपाचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मी प्रस्ताव काय होता यावर बोलत आहे. तरीही शिवसेनेने प्रस्ताव दिला नाही, असं म्हणत असाल तर मग मी काय एमआयएमचा नेता आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील 24 ऑक्टोबरला निकालानंतर ठरल्याप्रमाणे 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटप व्हावी, हे स्पष्ट केलं आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं होतं.

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

‘गोड बातमी काय आहे पाहावं लागेल. कोण कुठे जन्माला आलं आहे का, कुठे पेढे वाटायचे आहेत का, लग्नाच्या पत्रिका द्यायच्या आहेत का? पण मला खात्री आहे, एक दिवस स्वतः सुधीर मुनगंटीवार येऊन सांगतील की, गोड बातमी हीच आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार’, असंही संजय राऊत म्हणाले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे

राज्यपालांसोबत राज्यातील परिस्थितीबाबत बोललो आहोत. आमची भूमिका मांडली. रोज बोलणं आता योग्य नाही. महाराष्ट्र राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे. सरकार लवकर स्थापन होईल. मुख्यमंत्री सेनेचा होईल, असंही राऊत म्हणाले होते.

खेचाखेचीत महाराष्ट्राचं राजवस्त्र फाटेल

उद्धव ठाकरेंचंही तसं राजकारण नाही. पण तुझं ते तुझं आणि माझं ते माझं असं आमचं स्पष्ट मत आहे. माझं ते कुणाच्या बापाचं नाही. आणि कुणाचं हिसकवून घ्यायला आम्ही बसलेलो नाही, असं संजय राऊत यांनी नमूद केलं. एकत्र बसायचं आणि राजवस्त्र विणायचं, तेही महाराष्ट्राचे. नाहीतर खेचाखेचीत राजवस्त्र फाटेल, हे आम्हाला कळतं. आम्ही त्या संस्कारातून आलोय, असं संजय राऊत म्हणाले.

ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. राजकारणात सगळ्यांना पर्याय खुले आहेत.शिवसेना लहान मुलांचा पक्ष नाही. समसमान वाटप याचा अर्थ काय? त्यात मुख्यमंत्री पद येत नाही का? भाजप नेते जर पर्याय आहे म्हणत असतील, तर सेनेकडे पर्याय नाही का? आता प्रस्ताव नाही तर थेट चर्चा व्हावी, भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्तेचा दावा करावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता.

सत्ताधारी फोडाफोडीचं राजकारण करतात

सत्ताधारी फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतातच. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, हरियाणात असे प्रकार झालेले आहेत. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. पण यावेळी कोणत्याच पक्षाचा आमदार फुटणार नाही. काँग्रेस नाही, राष्ट्रवादीचा नाही. शिवसेनेचा तर प्रश्नच नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. अफवा पसरवणाऱ्यांनी स्वतःचे आमदार सांभाळावेत. शिवसेना आमदारांच्या आसपास फिरकण्याची, शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही. हिंमत करुन दाखवावी, असं चॅलेंजही संजय राऊतांनी दिलं होतं. BJP angry with Sanjay Raut

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.