काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही : संजय राऊत

शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, शिवसेना आमदार फुटण्याची अजिबात भीती नसून आमदारांना अज्ञातस्थळी हलवल्याचं वृत्त चुकीचं आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेनाच काय, राष्ट्रवादी-काँग्रेस अशा कोणत्याही पक्षाचा आमदार यावेळी फुटणार नाही (Shivsena MLAs). शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, शिवसेना आमदार फुटण्याची अजिबात भीती नसून आमदारांना अज्ञातस्थळी हलवल्याचं वृत्त चुकीचं आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला.

राऊत यांनी आठवड्याभरापासून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेण्याचा सुरु केलेला सिलसिला कायम आहे. पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या बैठकीसाठी रवाना झाले. ‘गोड बातमी काय आहे पाहावं लागेल. कोण कुठे जन्माला आलं आहे का, कुठे पेढे वाटायचे आहेत का, लग्नाच्या पत्रिका द्यायच्या आहेत का? पण मला खात्री आहे, एक दिवस स्वतः सुधीर मुनगंटीवार येऊन सांगतील की, गोड बातमी हीच आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार’, असंही राऊत म्हणाले.

145 चा आकडा असणाऱ्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा, ही त्यांची जबाबदारी आहे, असं आवाहनही संजय राऊत यांनी केलं.
फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचा वैयक्तिक वाद नाही, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. ही धर्म-अधर्म, सत्य-असत्याची लढाई आहे, जे ठरलं आहे, त्यानुसार पुढे या, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत

सत्ताधारी फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतातच. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, हरियाणात असे प्रकार झालेले आहेत. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. पण यावेळी कोणत्याच पक्षाचा आमदार फुटणार नाही. काँग्रेस नाही, राष्ट्रवादीचा नाही. शिवसेनेचा तर प्रश्नच नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. अफवा पसरवणाऱ्यांनी स्वतःचे आमदार सांभाळावेत. शिवसेना आमदारांच्या आसपास फिरकण्याची, शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही. हिंमत करुन दाखवावी, असं चॅलेंजही राऊतांनी दिलं.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. मी पक्षासाठी, उद्धव ठाकरेंसाठी, महाराष्ट्रासाठी काम करतो. मुख्यमंत्रिपदाची वैयक्तिक आशा-आकांक्षा नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मला आवडणाऱ्या शेर-शायरी मी ट्वीट करतो, अटलबिहारी वाजपेयीही मोठे कवी आहेत, त्यांचीही कविता कधीतरी सादर करेन, असं राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

काँग्रेस खासदार हुसैन दलवाई संजय राऊतांच्या भेटीला

संजय राऊत पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन ‘मातोश्री’कडे कूच

मी काय एमआयएमचा नेता आहे का? संजय राऊत यांचा भाजपला सवाल

शिवसेना फार पुढे गेली आहे, त्यामुळे दरवाजा खुला आणि दारांच्या फटीला महत्त्व नाही: संजय राऊत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *