मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत

बहुतेक ही गोड बातमी त्यांच्याकडूनच तुम्हाला कळेल की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय," असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी (Sanjay raut criticized sudhir mungantiwar) केले.

मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत

मुंबई : “राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा ही शेतकऱ्यांसह सर्वांची इच्छा (Sanjay raut criticized sudhir mungantiwar) आहे. भाजपचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून लवकरच गोड बातमी मिळेल असे सांगत आहे. बहुतेक ही गोड बातमी त्यांच्याकडूनच तुम्हाला कळेल की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय,” असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी (Sanjay raut criticized sudhir mungantiwar) केलं आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले. “काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, भाजप नेते विनोद तावडे, रामदास आठवले यांच्यासह अनेकजण राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह त्यांना कोणीही भेटू शकते.”

“पण जर राज्यपालांची भेट घेऊन ते सरकार स्थापनेचा दावा करुन ते सरकार बनवणार असेल. तर त्यांनी बहुमताचा आकडा दाखवून तो करावा. असेही ते म्हणाले. सरकार बनवण्याचा दावा करणे गरजेचे आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि चांगलं सरकार द्यावं. सगळ्यात मोठा पक्ष भाजपने किमान 145 जणांची यादी द्यावी, जेणेकरुन जनतेला आनंद होईल”, असेही संजय राऊत म्हणाले.

“भाजपचे सरकार येऊ नये असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. तसेच काँग्रेसच्या काही तरुण आमदारांनीही हिच भावना मला कळवली आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या मागण्यांचे मी कौतुक करतो. शिवसेनेचे सरकार यावं यासाठी मी त्यांचे स्वागत आणि कौतुक करतो,” असेही ते काँग्रेसबद्दल (Sanjay raut criticized sudhir mungantiwar) म्हणाले.

हमारे भी दरवाजे खिडकीयां खुली है, लेकिन हम नही चाहते है के कोई मच्छर अंदर आयें…असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांना उद्धव ठाकरेंकडून मार्गदर्शन होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाही,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 14 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI