पंकजा मुंडे आता धनंजय मुंडे यांची जागा घेणार?

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभव करत विजय मिळवला (Political Future of Pankaja Munde). या विजयासह विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे परळीचे आमदार म्हणून थेट विधानसभेत पोहचले.

पंकजा मुंडे आता धनंजय मुंडे यांची जागा घेणार?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभव करत विजय मिळवला (Political Future of Pankaja Munde). या विजयासह विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे परळीचे आमदार म्हणून थेट विधानसभेत पोहचले. आता परळीच्या माजी आमदार पंकजा मुंडे विधानपरिषदेच्या वाटेवर आहेत. इतकंच नाही, तर त्यांच्याकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचीही मागणी झाल्याची माहिती समोर येत आहे (Political Future of Pankaja Munde). त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांच्या जागा घेतल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे काहीशा नाराज दिसत आहेत. या पराभवानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा भाग म्हणून त्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे थेट विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचीच मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंबाबत भाजपकडून काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत लवकरच आपल्या पुढील प्रवासाची दिशा स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे पंकजा नेमका काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांच्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीने चर्चेला उधाण आलं आहे. आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी दबाव म्हणूनच मुंडे यांनी राजकीय दिशा ठरवण्याचं बोललं का असाही प्रश्न त्यानिमित्ताने विचारला जात आहे.

पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केल्याची चर्चा असली, तरी त्यांच्यासाठी ही मागणी पूर्ण होणं सोपं नसल्याचंच दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकिटच नाकारले गेलेले विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे या महत्त्वाच्या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्नही बाकी आहे. त्यामुळे हे नेते देखील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावेदार मानले जात आहेत. अशावेळी भाजप पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *