Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता.

Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी
पावसामुळे पाणी साचल्याने थेट वावरामध्येच विद्युत प्रवाह संचारला आहे. यामध्येच दोन बैलांचा मृत्यू झाला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 11:44 AM

पुणे : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. आतापर्यंत (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा आणि आता महावितरणचा ‘शॉक’. पावसाने उसंत घेतल्यानंतर आता कुठे शेती कामाला वेग येत आहे. पुणे जिल्ह्यतील भोर तालुक्यातही (Paddy Crop) भात लावण्यासाठी चिखल करणीचे काम सुरु आहे. बैलजोडीच्या माध्यमातून हे काम सुरु असतानाच अचानाक विजेचा धक्का लागल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला तर गरबुट पायामध्ये असल्याने दोन शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. शेतीकामे सुरु असतनाच अचानक आपल्या सर्जा-राजाला गमवावे लागले आहे. मध्यंतरीच्या पावसाने (Electric shock) विजेच्या खांबाचा वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ही हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे.

बांधावर विद्युत खांब, वीज प्रवाह पाण्यात

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता. त्यामुळे ही घटना घडली. मात्र, अचानक सर्वकाही झाल्याने शेतकऱ्यांनाही याबाबत काही समजले नाही. मात्र, बैलांना बाहेर काढताना त्यांनाही शॉक लागला त्यामुळे घटना नेमकी कशामुळे घडली हे त्यांच्या निदर्शणास आले .

नशिबाने वाचले शेतकऱ्यांचे प्राण

हरिश्चंद्री गावातले शेतकरी रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे भात लावणी साठी बैलाच्या साह्याने पारंपारिक पद्धतीने शेतात चिखल करत होते.विजेचा धक्का लागल्यान बैल अचानक खाली कोसळले, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या पायात गमबूट असल्यानं ते थोडक्यात बचावलेत. दरम्यान बैलांना शॉक बसल्यावर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, मात्र त्यांनाही शॉक बसू लागल्यानं ते खाचराच्या बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. खांबाला अर्थिंग नसल्यानं वीज प्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने, महावितरणच्या हलगर्जी पणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

एैन बैल पोळ्याच्या तोंडावर गमावली बैलजोडी

पोळा हा बैलांचा सण. आता खरिपाची पेरणी उरकताच शेतकऱ्यांना या सणाचे वेध लागतात. मात्र, दुर्घटनेमुळे पोळा सण करावा की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. एकाच वेळी दोन बैलांचा आणि ते ही डोळ्यादेखत झालेला मृत्यू यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याचं बरोबर बैल गेल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाल आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.