ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग ‘हा’ आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

| Updated on: Oct 12, 2021 | 11:35 AM

ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग हा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : कारखान्याला ऊस घालण्याच्या दृष्टीने शेतकरी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब करीत असतो. मात्र, शेतकऱ्यांच्या याच परस्थितीचा फायदा हा शेतमजूर किंवा कारखान्याकडून नियुक्त केलेले मुकादम हे घेतात. ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

साखर कारखाने सुरु झाले की, वेगवेगळ्या पध्दतीने जो-तो पैसे कमवण्याच्या यंत्रणेत गुंतलेला असतो. आता ऊस तोडणीची जबाबदारी ही साखर कारखान्यांची आहे. त्याअनुशंगाने मुकादम याला ऊस तोडणीचे पैसे देऊन कामगारांची सोय करण्यात आलेली असते. पण स्थानिक पातळीवर ऊस तोडणीस अडचणी आहेत, वाहन येऊ शकत नाही, ऊस हा तोडणीयोग्य नाही यासारखी कारणे सांगून पैशाची मागणी केले जाते. अशा प्रकारच्या तक्रारी थेट साखर आयुक्त कार्यालयापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळेच आता साखर आयुक्त यांनी पैशाची मागणी केली तर तक्रार करण्याचे अवाहन केले आहेय त्यामुळे या गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

ऊस गाळपाची चिंताच करु नका

गाळप हंगामात आपला ऊस कारखान्याला जातो की नाही, याची चिंता शेतकऱ्याला सतावत असते. आता पर्यंत दरवर्षी असेच झालेले आहे. यंदा ऊसाचे गाळप हे तब्बल 150 दिवस राहणार आहे. शिवाय केवळ साखर निर्मित एवढेच नाही तर यंदा इथेनॅालचीही निर्मिती करण्यात येणार आहेय त्यामुळे हंगाम संपेल आणि ऊस गाळप राहिल ही शंकाच ठेऊ नका असे अवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे अधिकचे पैसे ना ऊसतोड मजूराल ना मुकादमाला देण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

हा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी एका कृषी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सुचना साखर कारखान्यांना करण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक हा ग्रामपंचायतीच्या फलकावर नमूद केला जाणार आहे. शेतकऱ्याने त्या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ही तक्राक साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या मेलवर पाठवण्याचे अवाहनही करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहन क्रमांक ईत्यादी बाबींचा उल्लेख करण्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये पैशाच्या मागणीचे निष्पन्न झाले तर संबंधित मुकादमाच्या बिलातून ही रक्कम कापून घेतली जाणार आहे.

15 ऑक्टोंबर पासून कारखाने होणार सुरु

राज्यात 15 ऑक्टोंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होणार आहे. त्या अनुशंगाने साखर कारखान्यावर लगबग ही सुरु झाली आहे. मात्र, अधिकचा ऊस कारखान्यावर घेण्याच्या दृष्टीने जाहीर केलेल्या तारखेच्या आगोदर कारखाने सुरु केले तर कारवाई केली जाणार आहे. शिवाय ऊस कोणत्या कारखान्याला घालायचा याचे स्वातंत्र हे शेतकऱ्यांना असणार आहे. (Action to be taken against sugar factories if money is demanded for sugarcane harvesting)

संबंधित बातम्या :

15000 शेतकरी एकवटले अन् इतिहास घडला..

24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….