24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!

नाशिकच्या शेतकऱ्याने 24 लाख खर्चून बांधलेलं पॉलिहाऊस नांगर लावून उध्वस्त करुन टाकलं. लॉकडाऊनमुळे फुलाला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याने पॉलिहाऊस नष्ट केलं.

1/4
नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथील फुल उत्पादक शेतकरी विवेक जगताप यांनी पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांची शेती केली होती. याकरता या शेतकऱ्यास 24 लाख रुपये खर्च आला होता.

2/4
मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन लागला. याच लॉकडाऊन काळात नागरिकांना घराबाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे फुल विक्री झालीच नाही.

3/4
त्यातच गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपये खर्च करून उभे केलेली जरबेरा फुलशेती अक्षरशा रोटरच्या साह्याने नष्ट करण्याची वेळ या फुल उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

4/4
फुलांवर केलेला लाखो रुपये खर्च निघणे सुद्धा मुश्किल झाल्याने शेतकऱ्याने आपली जरबेरा फुल शेती नष्ट करुन टाकली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI