जनावरांसाठी घातक असलेल्या लाळ्या खुरकूतवर असे करा नियंत्रण…

जनावरांच्या लहान-मोठ्या आजाराने शेतकरीही त्रस्त असतात. मात्र, याबाबत उपाययोजनेची माहिती नसल्याने जनावरांचा आजार हा वाढतच जातो. त्यापैकीच खुरकूत हा आजार आहे. हा साथीचा आजार असून त्याचा प्रादुर्भाव कमी वेळेत जास्त जनावरांना होतो. हिवाळ्याच्या अंतिम टप्प्यात याची लागण होते.

जनावरांसाठी घातक असलेल्या लाळ्या खुरकूतवर असे करा नियंत्रण...
संग्रहीत छायाचित्र

लातूर : जनावरांच्या लहान-मोठ्या आजाराने शेतकरीही त्रस्त असतात. मात्र, याबाबत उपाययोजनेची माहिती नसल्याने जनावरांचा आजार हा वाढतच जातो. त्यापैकीच खुरकूत हा आजार आहे. हा साथीचा आजार असून त्याचा प्रादुर्भाव कमी वेळेत जास्त जनावरांना होतो. हिवाळ्याच्या अंतिम टप्प्यात याची लागण होते.

म्हणजे शेतकऱ्यांचे सुगी करण्याचे दिवस आणि इकडे जनावरांना खुरकूताची लागण असे चित्र असते. ज्या जनावरांची खुरजास्त पतरलेली अशा जनावराला हा आजार जास्त होतो. याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये म्हणून डिसेंबर महिन्यातच शासनाकडून लसीकरण केले जाते…पण त्याच्या उपाययोजनेबद्दल शेतकऱ्यांनाही अधिकची माहिती असणे आवश्यक आहे.

ही आहेत लाळ्या खुरकुताची लक्षणे

* खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते.
* या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात तर गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते.

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय

* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो.
* लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी

* ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.
* जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल.
* जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही.
* लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.

लाळ्या खुरकूत साथीचा आजार

हिवाळा अंतिम टप्प्यात असतानाच या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतर जनावरांनाही याची लागण होते. शिवाय काळजी घेताना लहान बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने या आजाराची तीव्रताही वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. (Advice to Farmers: Get control over saliva scraping disease that is dangerous for animals)

इतर बातम्या ;

पालघर, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; हेल्पलाईन जारी

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

महत्त्वाची बातमी: 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकेची ATM सेंटर्स होणार बंद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI