Nanded : शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच हुंकार यात्रेचे उद्दीष्ट, राजू शेट्टी यांचा केंद्र सरकारला थेट इशारा

शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रब्बी हंगमाच्या सुरवातीपासून केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे.असे असतानाही याकडे लक्ष दिलेले नाही. या मागणीला घेऊन राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात धरणे आंदोलनही केले होते. पण यावर सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.

Nanded : शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच हुंकार यात्रेचे उद्दीष्ट, राजू शेट्टी यांचा केंद्र सरकारला थेट इशारा
नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथील आयोजित हुंकार यात्रेत शेतकऱ्यांना संबेधित करताना राजू शेट्टीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:44 PM

नांदेड : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन (Swabhimani Shetkri Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा हा सुरुच आहे. पण यंदाच्या रब्बी हंगामापासून या संघटनेने लावून धरलेला प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. शेतीसाठी (Power Supply) दिवसा विद्युत पुरवठा करावा आणि शेतीमलाला (Guarantee Rate) हमीभाव देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे हे दोन प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. याकरिता संघटनेच्या माध्यमातून हुंकार यात्रा काढण्यात आली असून नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टिकास्त्र केले होते.

शेतकऱ्यांना हमीभावाचाच ‘आधार’

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अशक्य झाला आहे. शिवाय उत्पादन मिळाले तरी दर नाही अशी परस्थिती सातत्याने निर्माण होत असल्याने सरसकट सर्वच पिकांना हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. काही निवडक पिकांनाच हमीभावाचा आधार मिळत आहे. मात्र, याचे स्वरुप बदलून जर खर्चाच्या 50 टक्के अधिकचा हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे हमीभावाबाबत निर्णय घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

दिवसा विद्युत पुरवठ्याकडे सरकारचे दुर्लक्ष

शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रब्बी हंगमाच्या सुरवातीपासून केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे.असे असतानाही याकडे लक्ष दिलेले नाही. या मागणीला घेऊन राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात धरणे आंदोलनही केले होते. पण यावर सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. सबंध हंगामात शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत होते. या दरम्यान, जंगली प्राणी इतर प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्वाभिमानीची हुंकार यात्रा

सबंध राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय हे जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही हुंकार यात्रा काढण्यात आली आहे. सोमवारी ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे दाखल झाली होती. या यात्रेच्या दरम्यान अनेक प्रश्न मार्गी लावण्यातही संघटनेला यश मिळाले आहे. शिवाय शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न घेऊन अखेरीस राष्ट्रपती यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.