मराठवाड्यात 11 महिन्यात 805 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बीडचा आकडा भीतीदायक, काय घडतंय?

| Updated on: Dec 22, 2021 | 11:24 AM

चालू वर्षात नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली स्थिती यामुळे 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपलेले आहे. एकीकडे उत्पादनात दुपटीने वाढ, शेती व्यवसयात अमूलाग्र बदल हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहे ते बीड जिल्ह्यातील आकडेवारी पाहिल्यावर समोर येते.

मराठवाड्यात 11 महिन्यात 805 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बीडचा आकडा भीतीदायक, काय घडतंय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त म्हणून तर मराठवाड्याची ओळख आहेच पण येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरा चिंतेचा विषय बनत आहे. काळाच्या ओघाच शेती व्यवसयात अमूलाग्र बदल झाले आहेत. अत्याधुनिक यंत्राच्या वापराने उत्पादनात तर वाढ झाली आहे पण नैसर्गिक संकटांपुढे बीडचा शेतकरी हतबल होत आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतरी गेल्या 11 महिन्यांमध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 805 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपलेले आहे. एकीकडे उत्पादनात दुपटीने वाढ, शेती व्यवसयात अमूलाग्र बदल हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहे मराठवाड्यातील आकडेवारी पाहिल्यावर समोर येते. यामधील 605 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या ग्राह्य धरण्यात आल्या असून त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदत मिळणार आहे. तर 115 प्रकरणांवर अद्यापही निर्णय झालेला नाही.

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

सन 2020 मध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 773 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे जीवन संपवले होते. मात्र, कर्जमाफी करुनही यंदा आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली आहे हे विशेष. गतवर्षी मराठवाड्यातील 617 शेतकरी कुटूंब हे मदतीसाठी पात्र झाले होते. 110 प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत. 2019 मध्ये 937 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या तर त्यापैकी 761 शेतकरी कुटूंबीयांना मदत मिळाली होती तर 176 प्रकरणे ही नामंजूर झाली होती.

दोन महिन्याचा कर्दनकाळ..

पीक नुकसानीचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या संसारावर झालेला आहे. मध्यंतरी खरीप हंगाम बहरात असतानाच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत तब्बल 52 आत्महत्यांच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या होत्या. सर्वाधिक आत्महत्या या दोन महिन्यातच झाल्या आहेत. 1 जानेवारी ते 12 डिसेंबर या कालावधीतील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम असल्याचे आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. कारण ज्या महिन्यांमध्ये पिकांचे अधिकचे नुकसान झाले आहे त्याच महिन्यांमध्ये हा आकडा वाढलेला आहे.

काय आहेत कारणे?

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार एक ना अनेक योजना राबवत आहे. शिवाय काळाच्या ओघात शेतीपध्दतीमध्ये बदलही झाला आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीमालाला योग्य दर नसल्यामुळे शेतकरी हे टोकाचा निर्णय घेत आहेत. नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि त्यामधूनच आलेले नैराश्य यामुळेच अधिकतर शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. शिवाय उत्पादनवाढीसाठी घेतलेले कर्ज व त्याची परतफेड करु शकत नसल्यानेही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यामुळे मात्र, अनेक शेतकरी कुटूंबाचे संसार उघड्यावर आले आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना तुटपूंजी मदत

अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या ही अपात्रही ठरवली जाते. याकरिता बॅंकेचे अधिकृत कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल यासारख्या बाबी महत्वाच्या आहेत, मात्र, शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून 1 लाखाची मदत मिळते. यामध्ये 70 हजार रुपयांची मुदतठेव तर 30 हजार रुपये हे रोख कुटूंबियांना दिले जातात. मात्र, कुटूंबियांसाठी ही मदत तोडती असून यामध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मराठवाड्यातच नाही तर राज्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या बीडमध्ये होत असल्याचे एका सर्वेवरुन समोर आले होते.

संबंधित बातम्या :

Kharif Season : अखेर खरिपाची हुलकावणीच, तूर धोक्यात, साठवणूक करुनही सोयाबीन-कापसाचे दर कोमात

MSEDCL : शेतकऱ्यांकडून विजबीलाची वसुली अन् सरकारकडून कृषी पंपाची जोडणी, काय आहे सरकारचे धोरण?

Central Government : मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार