Kharif Season : उत्तर महाराष्ट्रात कपाशीने खरिपाचा ‘श्रीगणेशा’, शेती मशगतीची कामेही वेगात

यंदा वेळेपूर्वीच पाऊस असा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी विक्रमी उत्पादन घेण्याच्या तयारीला लागला होता. पेरणीपूर्वीची मशागतीची कामे आटोपून पहिला पेरा कापसाचा असे सर्वकाही नियोजन झाले होते मात्र, मान्सूनने आपला लहरीपणा हंगामाच्या सुरवातीपासूनच दाखवण्यास सुरवात केली होती. त्यामुळे जून अंतिम असतानाही शेतखकऱ्यांचा उद्देश साध्य़ झाला नव्हता.

Kharif Season : उत्तर महाराष्ट्रात कपाशीने खरिपाचा 'श्रीगणेशा', शेती मशगतीची कामेही वेगात
जळगाव जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस लागवडी शेतकऱ्यांचा भर आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 3:54 PM

जळगाव : राज्यात उत्तर महाराष्ट्रावर (Rain) पावसाची कृपादृष्टी राहिलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच या विभागात पाऊस झाल्याने किमान जूनच्या शेवटच्या आठवड्यात का होईना कापूस लागवडीची कामे होत आहेत. आतापर्यंत अपूऱ्या पावसामुळे (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या खोळंबल्या होत्या. शिवाय अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर विभागांमध्ये शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ही ठेवलेली नाही. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊसच अजून झालेला नसल्याने शेतकरी नको ते धाडस करीत नाही. आता शेतकऱ्यांचा भर (Soybean Crop) सोयाबीन आणि कापसावरच राहणार आहे. कडधान्याच्या पेरणीला उशीर झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले तरी अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता योग्य नियोजन करुनच चाढ्यावर मूठ ठेवावी लागणार आहे.

कापूस लागवडीची लगबग

यंदा वेळेपूर्वीच पाऊस असा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी विक्रमी उत्पादन घेण्याच्या तयारीला लागला होता. पेरणीपूर्वीची मशागतीची कामे आटोपून पहिला पेरा कापसाचा असे सर्वकाही नियोजन झाले होते मात्र, मान्सूनने आपला लहरीपणा हंगामाच्या सुरवातीपासूनच दाखवण्यास सुरवात केली होती. त्यामुळे जून अंतिम असतानाही शेतखकऱ्यांचा उद्देश साध्य़ झाला नव्हता. जळगाव जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झालेल्या क्षेत्रावर सध्या कापूस लागवडीची लगबग सुरु आहे. खरिपात कापसाला पहिली पसंती दिली जाते. मात्र, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे सर्वकाही गणित बिघडले आहे. आता सर्वकाही सुरळीत करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

मुक्ताईनगरात पेरणीचा जोर

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या आणि शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. मुक्ताईनगरात कापसाचे क्षेत्र अधिक आहे. असे असले तरी यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम खरीप हंगामावर झाला आहे. राज्यभर पाऊस सक्रीय होत असताना आता पेरणीचा श्रीगणेशा झालेला आहे. असे असले तरी पावसामध्ये सातत्य राहत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

हे सुद्धा वाचा

पेरणीपूर्व मशागत ही महत्वाचीच

शेतीची मशागत ही खरीप हंगामापूर्वीच करावी लागते. वर्षातून एकदा ही मशागत करुन उत्पादनवाढीचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. मशागत केल्याने शेतजमिन ही भुसभुशीत होते. शिवाय उत्पादन वाढीसाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे. यामुळे जमिनीचा पोत वाढतो तर तणविरहीत पिकांसाठी मशागत करणे गरजेचे आहे. उन्हाळी पिकांची काढणी होताच पावसाला सुरवात होईपर्यंत ही कामे आटोपून घेतली जातात. यातच आता मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेती कामांना वेग आला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.