AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Damage : दुष्काळात तेरावा, पावसाने हे काय केले ? साठवलेल्या कांद्यावरही पाणी फेरले

गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. रात्रीतून कांद्याचे दर बदलतात यावेळी मात्र दिवसेंदिवस घटत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वाढीव दराची प्रतिक्षा करतात व दरम्यानच्या काळात कांद्याची चाळीत साठवणूक करतात. त्याचप्रमाणे मुंजवाड येथील सोनवणे यांनी 12 ट्रॅक्टर कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या पावसामध्ये होत्याचे नव्हते झाले.

Onion Damage : दुष्काळात तेरावा, पावसाने हे काय केले ? साठवलेल्या कांद्यावरही पाणी फेरले
पावसामुळे कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 9:35 AM
Share

मालेगाव :  (Onion Rate) कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असताना आता नैसर्गिक संकटाचाही उत्पादकांना सामना करावा लागत आहे. बाजारपेठेत कांद्याला कवडीमोल दर मिळतोय. त्यामुळे (Nashik Farmer) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांद्याची साठवणूक केली आहे. ज्या सुरक्षतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ही धडपड केली ती एका पावसाने वाया घालवली आहे. सटाणा तालुक्यात दमदार पावासाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मुंजवाडचे भास्कर सोनवणे यांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. पावसाने असे काय थैमान घातले की चाळीत साठवलेला (Onion) कांदा वाहत थेट सटाणा शहारत घुसला. पावसामुळे सोनवणे यांचा तब्बल 50 क्विंटल पाण्यात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कांदा दराच्या बाबतीत जसा लहरीपणा मानला जातो तसाच हा मान्सूनदेखील आहे याची प्रचिती सोनवणे यांना चांगलीच आली.

12 ट्रॅक्टर कांद्याचे नुकसान

गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. रात्रीतून कांद्याचे दर बदलतात यावेळी मात्र दिवसेंदिवस घटत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वाढीव दराची प्रतिक्षा करतात व दरम्यानच्या काळात कांद्याची चाळीत साठवणूक करतात. त्याचप्रमाणे मुंजवाड येथील सोनवणे यांनी 12 ट्रॅक्टर कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या पावसामध्ये होत्याचे नव्हते झाले. चाळीतल्या कांद्याचे नुकसान तर झालेच पण तुफान पावसामुळे चाळीतला कांदा थेट सटाणा शहरापर्यंत वाहत आला होता. त्यामुळे सोनवणे यांच्या उद्देशावर पाणी फेरले गेले आहे.

दर वाढीची अपेक्षा असतानाच संकट

गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 3 ते 4 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हे चाळीत कांद्याची साठवणूक करतात. पावसाळ्याच्या तोंडावर आता कुठे दर वाढण्यास सुरवात झाली होती. शिवाय भविष्यात दर वाढतील या उद्देशाने सोनवणे यांनी साठवणूक केली मात्र, पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी अवस्था झाली आहे. कांदा चाळीचा उपयोग आणि सोनवणे यांचा उद्देश पावसामुळे साध्य झाला नाही.

नुकसानभरपाईची मागणी

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी कांदा बाजारात असताना आणि आता सुरक्षतेसाठी चाळीत असतानाही नुकसान हे अटळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे 50 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अचानक हे संकट कोसळले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.